कलाकारांना घडवित रंगभूमी समृद्ध केली

महाराष्ट्र टाइम्स

ज्येष्ठ रंगकर्मी गजानन पांडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांनी रंगभूमीवर अनेक पिढ्यांना घडवले. पांडे हे शिक्षक आणि रंगकर्मी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. त्यांच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली. अनेक मान्यवर उपस्थित होते.

the ideal life work of stage legend gajanan pandey

‘रंगभूमी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ रंगकर्मी गजानन पांडे यांनी आपल्या समर्पित जीवनकार्यातून अनेक पिढ्यांना रंगमंचावर उतरवले. अभिनय, दिग्दर्शन आणि नाट्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी नवोदित कलाकारांना घडविताना रंगभूमीची समृद्ध परंपरा पुढे नेण्याचे कार्य सातत्याने केले’, असा सूर मान्यवरांनी व्यक्त केला.

रंगकर्मी गजानन पांडे यांचे नुकतेच निधन झाले. राजाराम सीताराम दीक्षित वाचनालय, धरमपेठ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर उपनगर क्रमांक एक शाखेच्या मुक्त रंगपीठावर मंगळवारी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

जवळपास चाळीस वर्षे हाैशी रंगभूमीवर लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून कार्यरत गजानन पांडे हे साेमलवार शाळेत गणित या विषयाचे शिक्षक हाेते. विवेक खेर, संजय भाकरे यांसह इतर मान्यवरांनी त्यांच्यासाेबतच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्यातील शिक्षकी बाणा कायम दिग्दर्शनात डाेकावत हाेता. कलाकारांची नस ते बराेबर ओळखायचे. त्यामुळेच आम्ही कलावंत म्हणून घडलाे, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर उपनगर क्रमांक एक शाखेच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये आता गजानन पांडे यांच्या नावानेही पुरस्कार दिला जाणार अशी घोषणा सलीम शेख यांनी यावेळी केली.

श्रद्धांजली सभेला ज्येष्ठ रंगकर्मी अनिल चनाखेकर, विवेक खेर, रंजना पाठक, किशोर भादंककर, महेश पातुरकर, प्रकाश एदलाबादकर, संजय भाकरे, प्रकाश देवा, पूजा पिंपळकर-भोयर, मंजुश्री डोंगरे, सारनाथ रामटेके, रूचिता पंडिया, प्रा. शिशिर वर्मा, अतुल भुसारी, प्रभाकर आंबोणे, वत्सला आंबोणे, देवेंद्र लुटे, नरेंद्र शिंदे, दिलीप देवरणकर, अभय अंजीकर, प्रभा देउस्कर, श्वेता पक्ती, निखील टागळे, राेशन खाेब्रागडे, हेमंत डिके, रूपेश पवार, मंगेश बावसे, प्रशांत मगदे, शंकर शंखपाळे, सारंग अभ्यंकर, सुधीर शिनखेडे, वसंत दक्षिणकर, अश्विन नाईक, मंगेश पैदाम, सलीम शेख आदी रंगभूमीशी संबंधित मान्यवर उपस्थित होते.