मेयोत टँकरने पाणीपुरवठा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) ३६ तास पाणीपुरवठा बंद होता. या काळात रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी रुग्णालय प्रशासनाने २५ पाण्याचे टँकर मागवले होते. ओसीडब्लूने पाणीपुरवठा खंडित केला होता. मात्र, प्रशासनाच्या पूर्वतयारीमुळे रुग्णसेवेत कोणतीही अडचण आली नाही. पाण्याची गरज ओळखून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या.

water shortage at mayo and services maintained through tankers

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) रविवारपासून ३६ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर पाण्याचा तुटवडा जाणवू नये म्हणून रुग्णालय प्रशासनाने खबरदारी उपाय म्हणून २५ पाण्याचे टँकर मागविले होते. पाण्याअभावी निर्माण होणाऱ्या संभाव्या अडचणी आधीच लक्षात घेऊन टँकर मागविल्याने मेयोतील रुग्णसेवेत कोणतीही अडचण गेली नाही. ‘ओसीडब्लू’कडून शहरातील काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामध्ये मेयो रुग्णालय परिसरातील पाणी पुरवठ्यात खंड पडला होता. पाणीपुरवठा बंद असल्यामुळे रुग्णालयातील विविध विभागांवर ताण निर्माण होण्याची शक्यता होती. रुग्णसेवा सुरळीत राहावी यासाठी रुग्णालय प्रशासनाने पाण्याची गरज लक्षात घेता पूर्वतयारी करत टँकरची व्यवस्था केली होती.