मोडक सागर धरणाला ‘ओहोटी’

Contributed by: मुंबई,म. टा. खास प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मोडक सागर धरणाला ‘ओहोटी’
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी महत्त्वाच्या असलेल्या मोडक सागर धरणातील पाणीसाठा खालावला आहे. जुलै महिन्यात तुडुंब भरलेल्या या धरणात तूर्तास ७० टक्के जलसाठा आहे. उन्हाचा तडाखा वाढत असल्याने पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवनही होत आहे. मात्र, या सर्व घडामोडींवर महापौर रितू तावडे यांनी मुंबईत सध्या दुष्काळी परीस्थिती नसून राज्य सरकारशी चर्चा करून मगच पाणी कपात मागे घेण्याबाबत निर्णय घेऊ, असे बुधवारी स्पष्ट केले. तर मुंबईत जलतरण तलाव आणि इतर कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यावरही निर्बंध आणण्याचा विचार करू, असे स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

मुंबई महापालिका स्थायी समितीकडून पिसे पांजरापूर जलप्रणाली, उदंचन केंद्र,मोडक सागर आणि तानसा धरणाचा सर्वपक्षीय सदस्यांसाठी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महापौर रितू तावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, सभागृह नेते गणेश खणकर, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि स्थायी समिती सदस्य हजर होते. मोडक सागर धरण पाहणी दौऱ्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत महापौरांनी मुंबईत सध्या दुष्काळ परिस्थिती नसल्याचे सांगितले. तरीही राज्यातील शेतकऱ्यांचा विचार करता मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापौरांनी केले. एल निनोचा प्रभाव बघता फेब्रुवारी, २०२७ मध्ये पाण्याची काय परिस्थिती असेल, असे विचारले असता राज्य सरकारशी चर्चा करून मगच पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला जाईल, असे महापौरांनी (पान ४वर)