महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीसाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात १६ जानेवारीला माजी महापौर तथा शिवसेनेचे सहप्रमुख विकास जैनसह शिवा राजपुत, अभिषेक जीवनवाल यांना पोलिसांनी लाठीमार करून अमानुषपणे मारहाण केली.
या घटनेचा निषेध व्यक्त करून लाठीमार करणाऱ्या सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांच्यासह अन्य पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करून, या पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडे शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथील मतमोजणीच्या प्रवेशद्वार येथे ही घटना घडली. या घटनेबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी आयुक्त पवार यांची भेट घेतली.
या वेळी शिवसेना नगरसेवक हर्षदा शिरसाट यांच्यासह नगरसेवक राजू राजपूत, अभिजीत जीवनवाल, नगरसेविका छाया वाघचौरे, उपजिल्हाप्रमुख संतोष बोर्डे, राजू राठोड, शहरप्रमुख विजय वाघचौरे प्रसिद्धीप्रमुख अभिजीत पगारे, विजय पैठणे, पराग कुंडलवाल, सचिन वाहुळकर,गुड्डू बासनीवाल , बाळासाहेब गायकवाड, कन्हैया देवतवाल, जयदीप माहोरे, सागर वाघचौरे, मनोज लिंगायत, अरविंद राऊत, लखन कुमावत, करण बारवाल, अंशाराम वडकाटे, अभिषेक मंत्री आदी उपस्थित होते.





