Consensus On Khameneis Successor Mojtaba Khamenei In The Lead
खामेनी यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत मतैक्य
महाराष्ट्र टाइम्स•
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या निधनानंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या निवडीवर एकमत झाले आहे. लवकरच नवीन सर्वोच्च नेत्याच्या नावाची घोषणा केली जाईल. धर्मगुरुंची ८८ सदस्यीय समिती हा निर्णय घेते. खामेनी यांचे पुत्र मोजताबा हे उत्तराधिकारी म्हणून चर्चेत आहेत. इस्रायली लष्कराने नव्या नेत्यावर हल्ल्याचा इशारा दिला आहे.
अमेरिकेने आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या जागी कोणाला बसवायचे यावर आता एकमत झाले असून लवकरच नवीन नेत्याच्या नावाची घोषणा केली जाईल. विशेष म्हणजे, नवीन सर्वोच्च नेते आणि त्यांना निवडणाऱ्या समितीतील सदस्यांवरही हल्ल्याचा इशारा इस्रायली लष्कराने दिला आहे.
इराणच्या नियमांनुसार, धर्मगुरूंची एक ८८ सदस्यांची समिती देशाच्या सर्वोच्च नेत्याची निवड करते. या समितीचे सदस्य अयातुल्ला मोहम्मद महदी मिरबाघेरी यांनी सांगितले की, "खामेनी यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत एकमताने निर्णय झाला आहे."सध्या, अयातुल्ला खामेनी यांचे पुत्र मोजताबा हे नवीन सर्वोच्च नेते म्हणून सर्वात पुढे आहेत.