दोन भावंडे अपघातात जखमी

महाराष्ट्र टाइम्स

छत्रपती संभाजीनगरमध्ये सलीम अली चौकात एक दुर्दैवी अपघात घडला. भरधाव वेगात आलेल्या एका चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दोन भावंडे गंभीर जखमी झाली. हा अपघात २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी झाला. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

car collides with bike two siblings injured
छत्रपती संभाजीनगरमध्ये सलीम अली रोडवर एका दुचाकीला भरधाव चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दोन सख्खे भाऊ जखमी झाले. ही घटना २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चारचाकी वाहनचालकाविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलमान शमशोद्दीन सय्यद, वय २४, रा. हर्सूल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या भावासोबत एमएच २० एफजे ४४५१ या क्रमांकाच्या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी मागून वेगात आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सलमान सय्यद आणि त्यांचा भाऊ दोघेही जखमी झाले. पोलिसांनी अज्ञात चारचाकी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.