विद्यापीठातर्फे नवीन अभ्यासक्रम

महाराष्ट्र टाइम्स

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे रोजगाराभिमुख शिक्षणाला प्रोत्साहन दिले जात आहे. विद्यापीठाच्या दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्राने ठाण्यातील रुस्तमजी ॲकॅडमी ऑफ ग्लोबल करिअरसोबत करार केला आहे. या करारानुसार तीन नवीन 'इंडस्ट्री एम्बडेड' अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना थेट उद्योगात काम करण्याचा अनुभव मिळेल. बी.व्होक. आणि एम.व्होक. शाखेतील विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल.

new industry embedded courses launched at dr babasaheb ambedkar marathwada university

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्राच्या वतीने ठाणे स्थित रुस्तमजी ॲकॅडमी ऑफ ग्लोबल करिअर यांच्या समवेत करार करण्यात आला आहे. करारानुसार तीन नवीन ‘इंडस्ट्री एम्बडेड’ अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत,’ अशी माहिती संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली.

व्यवसायाभिमुख ‘अप्रेंटिसशीप इंडस्ट्री एम्बडेड डिग्री प्रोग्राम’ सुरू करण्यात येणार आहेत. या संदर्भात प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषद कक्षात बैठक झाली. कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, संचालक डॉ. गवळी ॲकॅडमीचे डॉ. हनिफ कंजिर, करण देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. बी.व्होक. (इंडस्ट्रीयल ऑटोमेशन) ही पदवी व एमव्होक (इंडस्ट्रीयल ऑटोमेशन) आणि एम व्होक (ऑटोमोबाइल) या पदव्युत्तर शाखेतील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. पदवीचे तीस तर पदव्युत्तरचे प्रत्येकी वीस विद्यार्थी ‘इंडस्ट्री एम्बडेड’ साठी प्रवेश घेऊ शकतील.