नीलगिरीबाग जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत येणाऱ्या नाशिक पूर्व प्रभाग क्रमांक १५ मधील पाणीपुरवठ्याच्या नियोजनात महापालिकेने महत्त्वाचा बदल केला आहे. द्वारका आणि गोडेबाबा जलकुंभावरून दिवसातून दोनदा होणारा पाणीपुरवठा आता दिवसातून एक वेळ करण्यात येणार आहे. हे नियोजन आज, सोमवार (दि. १६)पासून प्रायोगिक तत्त्वावर लागू होईल. संबंधित परिसरातील नागरिकांनी या नवीन वेळापत्रकाची नोंद घ्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा बदल चाचणी स्वरूपातील असून, त्यात भविष्यात गरजेनुसार बदल केले जाऊ शकतात.
द्वारका जलकुंभातून आता सकाळी ६.३० ते ९ या वेळेत पाणीपुरवठा होणार आहे. टाकळी फाटा, गाडगे महाराज वसाहत, टाकळी फाटारोड, श्रीराम सोसायटी, शंकरनगर, माणेकशानगर (संपूर्ण), रवींद्र शाळा परिसर, सिद्ध गौतम सोसायटी, रंगूबाई जुन्नरे शाळा परिसर, वसंतबहार सोसायटी, नावीन्य सोसायटी, मधुबन सोसायटी, बोडके प्लाझा, हनुमान मंदिर (काठे गल्ली सिग्नल), बनकर चौक, त्रिकोणी गार्डन, सिटी केअर हॉस्पिटल परिसर, बनकर मळा आणि पुणे महामार्ग भागात या वेळेत पाणी मिळणार आहे.