हुतात्मा निकम अनंतात विलीन

महाराष्ट्र टाइम्स

पिंपळोशीचे जवान बाळकृष्ण निकम सिक्कीम व पश्चिम बंगाल सीमेवर कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 'बाळकृष्ण निकम अमर रहे' अशा घोषणांनी त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. २३ वर्षे सेवा बजावलेल्या निकम यांचे पार्थिव विशेष विमानाने गावी आणण्यात आले. पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले.

हुतात्मा निकम अनंतात विलीन
सातारा जिल्ह्यातील पिंपळोशी गावचे सुपुत्र, ४१ वर्षीय जवान बाळकृष्ण निकम , सिक्कीम आणि पश्चिम बंगाल सीमेवर कर्तव्य बजावत असताना वीरगतीला प्राप्त झाले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी ‘बाळकृष्ण निकम अमर रहे’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत त्यांना अखेरची मानवंदना दिली. सैन्य दल आणि पोलिसांच्या तुकड्यांनीही त्यांना सलामी दिली.

दुर्गम सीमेवर कर्तव्य बजावत असताना बुधवारी बाळकृष्ण निकम शहीद झाले. त्यांचे पार्थिव विमानाने पुणे येथे आणण्यात आले. त्यानंतर कऱ्हाडमार्गे ते त्यांच्या गावी पिंपळोशी येथे आणण्यात आले. बाळकृष्ण निकम हे रेडिओ ऑपरेटर म्हणून सैन्य दलात कार्यरत होते. त्यांनी २३ वर्षे देशसेवा केली होती आणि २०२७ मध्ये ते निवृत्त होणार होते. या दुर्दैवी घटनेनंतर पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. या कठीण प्रसंगी त्यांनी कुटुंबियांना धीर दिला.