आंदोलनाच्या खटल्यातराजू शेट्टींची मुक्तता

महाराष्ट्र टाइम्स

ऊस दराच्या आंदोलनाशी संबंधित खटल्यात माजी खासदार राजू शेट्टी आणि इतर ८० आंदोलकांना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. बारा वर्षांपूर्वी झालेल्या या आंदोलनात तोडफोड आणि जाळपोळ झाली होती. पुराव्याअभावी सर्वांची सुटका झाली. या निर्णयानंतर न्यायालयाबाहेर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

raju shettys acquittal the movement proves true
ऊस दराच्या आंदोलनाशी संबंधित एका जुन्या प्रकरणात कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने माजी खासदार राजू शेट्टी आणि इतर ८० आंदोलकांना निर्दोष मुक्त केले आहे. तब्बल बारा वर्षांपूर्वी झालेल्या या हिंसक आंदोलनाच्या खटल्याचा निकाल जिल्हा न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी दिला. या निर्णयामुळे न्यायालयाबाहेर आंदोलकांनी मोठा जल्लोष केला.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे ऊस दराच्या आंदोलनादरम्यान राजू शेट्टी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या घटनेचा निषेध म्हणून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी 'जेल भरो' आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. आंदोलनादरम्यान वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ झाली होती. त्यामुळे एकूण ३ हजार ७८१ आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणातील ८० कार्यकर्त्यांना पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले. या निर्दोष मुक्ततेनंतर राजू शेट्टी आणि इतर सर्व कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.