‘ईडी’कडूनही तपासाचा इशारा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नाशिकमधील म्हाडा घरकुल योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. बिल्डरांसह मोठ्या लोकांवर कारवाई होणार आहे. चौकशी अहवालानंतर ईडीकडूनही तपास केला जाईल. दुसरीकडे, सिडकोत पाणीबाणीने नागरिक त्रस्त आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर येत आहेत.

ed issues warning for investigation into builders fraud

नाशिक : नाशिकमधील ‘म्हाडा’च्या घरकुल योजनेतील घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी ‘एसआयटी’ स्थापन करण्यात आली असून, या प्रकरणात गरिबांचे रक्त पिणाऱ्या ‘बिल्डरां’सह एकही ‘बडा मासा’ सुटणार नाही. या प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर गरज पडल्यास ‘ईडी’कडून तपास केला जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

सविस्तर वृत्त...२

सिडकोत पाणीबाणी

सिडको : प्रभाग क्रमांक २८ मधील जय हिंद कॉलनी परिसरात तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. पहिलेच सलग दोन दिवस पाणीपुरवठा ठप्प असताना, त्यात शनिवार-रविवार असा ४८ तासांचा शटडाउन जाहीर झाल्याने घरात पाण्याचा थेंबही उरलेला नाही.

सविस्तर वृत्त...७

मुख्यमंत्री नाशिकमध्ये

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, रविवारी (दि. ५) नाशिक दौऱ्यावर येत असून, पंचवटीतील स्वामी नारायण मंदिर येथे आयोजित संत संमेलनात ते उपस्थित राहणार आहेत. त्यांचे शहरात दुपारी बाराला आगमन होणार असून, दोनला ते पुन्हा मुंबईला रवाना होणार आहेत.