सोशल मीडिया पोस्टर्स, प्रेझेंटेशन्स, पोस्टर्स, बिझनेस कार्ड्स, सर्टिफिकेट्स, यूट्यूब थंबनेल, इंस्टाग्राम रील्स व्हिडिओ, फोटो एडिटिंग, डिझाइनच्या व्यावसायिक कल्पना, वेबसाइट डिझाइन तयार करणे; तसेच एआय फीचर्सचा वापर अशा अनेक गोष्टी बेसिक ते ॲडव्हान्स स्वरूपात शिकवल्या जाणार आहेत.
पोस्टर्स, प्रेझेन्टेशन, फोटो एडिटिंग आणि रील्स सर्व काही एका ठिकाणी शिकवणाऱ्या ऑनलाइन ‘ग्राफिक डिझाइन कार्यशाळेचे’ आयोजन ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’ आणि ‘स्प्रेडिंग नॉलेज’तर्फे करण्यात आले आहे. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांपासून व्यावसायिकांपर्यंत; तसेच गृहिणींसाठीही उपयुक्त ठरणार आहे.
या कार्यशाळेत कॅनव्हा या सोप्या व प्रभावी डिझाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आकर्षक पोस्टर्स, प्रेझेंटेशन, फोटो एडिटिंग आणि सोशल मीडियासाठी रील्स तयार करण्याचे कौशल्य शिकवले जाणार आहे. डिझाइनचे पूर्वज्ञान नसतानाही सहभागी होण्याची संधी देण्यात आली असून, व्यावसायिक दर्जाचे ग्राफिक डिझाइन करण्यासाठी आवश्यक मूलभूत संकल्पना आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळणार आहे. आजच्या स्पर्धात्मक काळात ग्राफिक डिझाइन हे उत्पन्नाचे प्रभावी साधन ठरत आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’च्या विद्यार्थ्यांना शुल्कामध्ये विशेष सवलत मिळणार आहे.
या कार्यशाळेसाठी वयाची किंवा शिक्षणाची अट नाही. डिझाइनचे पूर्वज्ञान नसतानाही कोणीही या कोर्समध्ये सहभागी होऊ शकतो. हा कोर्स ऑनलाइन लाइव्ह झूमवर होईल. सहभागी विद्यार्थ्यांना पीडीएफ, व्हिडिओ लिंक; तसेच रेकॉर्डेड लेक्चर्सची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. कार्यशाळेचे मार्गदर्शन अभिषेक तावसाळकर करणार असून, त्यांना वेब डिझाइन, एसईओ आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील अनुभव आहे. एआयविषयी त्यांचा अभ्यास असून, त्यांची स्वतःची ग्राफिक डिझाइन कंपनीदेखील आहे.







