रखडलेल्या कामांना मुहूर्त

महाराष्ट्र टाइम्स

पुणे परिसरातील रखडलेल्या महामार्ग प्रकल्पांना गती मिळाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ४५ हजार कोटी रुपयांच्या चार प्रमुख प्रकल्पांची घोषणा केली आहे. हे प्रकल्प येत्या महिन्यात सुरू होणार आहेत. यामुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. या प्रकल्पांमुळे पश्चिम महाराष्ट्राच्या विकासालाही चालना मिळेल.

highway expansion projects in pune gain momentum

पुणे परिसरात अनेक वर्षांपासून केवळ चर्चेत असलेल्या महामार्ग विस्तार प्रकल्पांना अखेर गती मिळाली आहे. पुणे शहराला वाहतूक कोंडी आणि प्रदूषणातून मुक्त करण्यासाठी केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी महत्त्वाचा कृती आराखडा जाहीर केला.

एक लाख १० हजार कोटींच्या प्रकल्पांची घोषणा


रखडलेल्या कामांना मुहूर्त

पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे एक लाख १० हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची घोषणा त्यांनी केली असून, त्यापैकी सुमारे ४५ हजार कोटी रुपयांच्या चार प्रमुख प्रकल्पांचे भूमिपूजन येत्या महिन्यात करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये पुणे ते शिरूर, हडपसर-यवत, नाशिक फाटा ते खेड; तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर या उन्नत मार्गांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे पुणे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

प्रकल्पांचा आढावा

पुणे शहर व परिसरातील विविध प्रकल्पांचा गडकरी यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला. या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), महामेट्रो, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ (एमएसआयडीसी) आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

‘कोंडीची समस्या गंभीर’

गडकरी म्हणाले, ‘पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यासाठी ४५ हजार कोटींचे प्रकल्प राज्य सरकारला सादर केले होते. त्यासाठी वस्तू सेवा करात सूट, आवश्यक ठिकाणी भूसंपादन, रॉयल्टीमध्ये सवलत अशा सुविधांची मागणी केली होती. त्यानुसार आता चार प्रकल्पांचे काम महिनाभरात सुरू केले जाणार आहे. त्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या वेळा घेण्यास सांगितले आहे. या चारही प्रकल्पांचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ (एमएसआयडीसी) यांच्या मार्फत केले जाणार आहे. त्यांच्या कामावर ‘एनएचएआय’मार्फत देखरेख ठेवली जाईल.

दरम्यान, नितीन गडकरी यांनी आगामी महिनाभरात या प्रकल्पांच्या कामास सुरुवात होईल, असे सांगितल्याने पुढील काळात जिल्ह्यातील वाहतूक कोंडी काहीशी कमी होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.