विवाहितेवर बलात्कार करणारा अटकेत

महाराष्ट्र टाइम्स

समर्थ पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. या तरुणाने एका विवाहितेवर बलात्कार केला. महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. तिच्याकडील दागिनेही हिसकावले. पतीसोबत झालेल्या भांडणाचा सूड घेण्यासाठी भावालाही महिलेवर अत्याचार करण्यास सांगितले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

arrest of rapist who threatened to kill a woman

महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार करणाऱ्या तरुणाला समर्थ पोलिसांनी अटक केली. आरोपीने पीडित महिलेला दमदाटी करून तिचे दागिने हिसकावले; तसेच तिच्या पतीबरोबर झालेल्या भांडणाचा सूड घेण्यासाठी स्वतःच्या भावाला महिलेवर अत्याचार करण्यास सांगितल्याचेही पोलिस तपासात उघडकीस आले.

सुमेश शंकर गेंदे (वय ३०, रा. पुयणी, ता. पालम, जि. परभणी) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीसह त्याच्या भावाविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार बलात्कार आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पीडितेने समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना २६ सप्टेंबर ते ५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान घडली, असे तक्रारीत नमूद आहे. आरोपी पुण्यात नोकरी करत होता. त्याने पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. तिची कर्णफुले, मुलाच्या गळ्यातील सोन्याचे पदक हिसकावून विकले. आरोपीचे पीडितेच्या पतीबरोबर भांडण झाले होते. त्याचा सूड घेण्यासाठी त्याने भावालाही पीडितेवर अत्याचार करण्यास प्रवृत्त केले, असे तक्रारीत नमूद आहे. आरोपीच्या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी गेंदे याला अटक केली. सहायक निरीक्षक मगदूम तपास करत आहेत.