शहरातील पोलिस अधिकाऱ्याच्या घरातून एक लाख ६१ हजाराच्या सोन्याच्या बांगड्या आणि रोकड चोरल्याची घटना समोर आली. पोलिसांनी घरकामासाठी येणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. नोकराचे नाव सुमीत सुभाष निंदाने (वय ३०, रा. भुजबळनगर) असे आहे.
उर्मिला सुभाष घारगे (वय ६७, रा. विश्रामबाग, सांगली) यांनी तक्रार दिली. त्या काही दिवसांसाठी त्यांच्या मुलगी पोलिस उपायुक्त शर्मिष्टा घारगे यांच्याकडे शहरातील अदालत रोडवरील मनीषा कॉलनी येथे राहण्यास आल्या होत्या. १६ जानेवारीला चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास उपनिरीक्षक गिरी करीत आहेत. दरम्यान पोलिसांनी सुमीत निंदाने याला ताब्यात घेतले, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली.







