Notorious Gangster Shooting Incident In Pundliknagar
पुंडलिकनगरमध्ये गुंडाचा गोळीबार
महाराष्ट्र टाइम्स•
छत्रपती संभाजीनगरमध्ये पुंडलिकनगर येथे जुन्या वादातून एका व्यक्तीवर गोळीबार झाला. कुख्यात गुंड शुभम जाटने शिवशाहीनगर परिसरात एका घरासमोर हा हल्ला केला. त्याच्यासोबत इतरही जण होते. पोलिसांनी शुभम जाटला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या वादातून एका व्यक्तीला मारण्याच्या उद्देशाने कुख्यात गुंड शुभम जाटने शिवशाहीनगरमध्ये एका घरासमोर गोळीबार केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेत सचिन बाली लाहोट यांनी तक्रार दाखल केली असून, त्यांच्या घरात झोपलेल्या असताना आरोपींनी त्यांना बाहेर बोलावून धमक्या दिल्या.
सचिन लाहोट हे कंत्राटी सफाईकामगार असून ते कुटुंबासोबत राहतात. सोमवारी सकाळी ते घरात झोपले होते. अचानक त्यांना शिवीगाळ आणि आरडाओरडा ऐकू आला. खिडकीतून पाहिल्यावर त्यांना शुभम जाट , मयूर संजय उनगे, शिवा उर्फ छोट्या रमेश भालेराव, गोल्या उर्फ विजय दिनकर धनई, मनोज संजय पडूळ, सागर राऊत आणि अमर उर्फ अतुल पवार दिसले. शुभम जाट ‘सचिन बाहर आजा, आज तुझे खतम करना है,’ असे ओरडत होता. त्याच्या हातात बंदूक होती, तर इतरांच्या हातात तलवारी आणि चाकू होते. त्यानंतर सर्वजण पळून गेले.या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत शुभम जाटने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.