गेले पाच दिवस पुण्यात ज्या पुणे ग्रँड टूर सायकल शर्यतीची चर्चा सुरू होती, त्याचा समारोप शुक्रवारी झाला. या शर्यतीत एकूण ४३७ किलोमीटर अंतर होते. ‘ली निंग स्टार’ संघाचा ल्यूक मजवे (न्यूझीलंड) याने एकूण ९ तास ३३ मिनिटे ०४ सेकंद अशी वेळ नोंदवून पुण्यातील टप्प्यातील विजेता ठरला.
या स्पर्धेत ३५ देशांचे २८ संघ आणि १६४ सायकलपटू सहभागी झाले होते. मागील पाच दिवस वाहतुकीतील बदल, शाळा बंद, चकाचक रस्ते, स्पर्धा हवी की नको, स्पर्धेसाठीचा खर्च यावर पुण्यात चर्चा झडत होत्या. यासाठी १५०० पोलिस अधिकारी आणि इतर सर्व यंत्रणा कामाला लागली होती. सुदैवाने कुठलाही अनुचित प्रकार यादरम्यान घडला नाही आणि या स्पर्धेचा समारोप बालगंधर्व रंगमंदिरासमोर झाल्यानंतर स्पर्धा सुफळ संपूर्ण झाल्याचा निश्वास सर्वांनीच सोडला.
ल्यूकने ‘पुणे’ जिंकले...९
मेळ घालणारी ट्रॉफी...प्लस १









