केवळ पाठ्यपुस्तकांपुरते शिक्षण न ठेवता विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक कुतूहल जागे व्हावे, या हेतूने शिक्षक नागनाथ विभुते यांनी शाळेत ‘खालुंब्रे अ ॅस्ट्रॉनॉमी क्लब’ची स्थापना केली. भविष्यात नासाच्या सेवानिवृत्त व भारतीय वंशाच्या संशोधिका सुनीता विल्यम्स यांच्याशी विद्यार्थ्यांची व्हर्च्युअल संवाद बैठक घडवून आणण्याचाही विभुते यांचा मानस आहे. दरम्यान, शिक्षक, विद्यार्थ्यांच्या यशाचे परिसरातून कौतुक होत आहे.
खालुंब्रे (ता. खेड) येथील जिल्हा परिषद शाळेतील अकरा विद्यार्थिनी आणि अकरा शिक्षकांची नावे थेट चंद्रावर पाठवली जाणार असून, ‘नासा’ या आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेच्या ‘आर्टेमिस-२’ मोहिमेत त्यांचा ऐतिहासिक सहभाग नोंदवला जाणार आहे. या विद्यार्थिनींच्या नावांचे बोर्डिंग पास ‘नासा’कडून देण्यात आले असून, हा क्षण शाळेसह संपूर्ण परिसरासाठी अभिमानास्पद ठरला आहे.
या मोहिमेत ‘व्हर्च्युअल गेस्ट’ म्हणून सहभागी होण्याबाबत ‘नासा’ने आवाहन केले होते. त्यामध्ये शाळेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फुर्तपणे नोंदणी केली होती. या नोंदणी केलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे बोर्डिंग पास, नोंदणी क्रमांक पाठविण्यात आले असून, त्यांना मोहिमेचे प्रक्षेपण व्हर्च्युअली पाहता येणार आहे. ही नावे एका ‘एसडी कार्ड’मध्ये संग्रहित करून ओरियन अंतराळयानाद्वारे चंद्राकडे जाणार आहेत. ‘आर्टेमिस-२’ ही अंदाजे १० दिवसांची मोहीम असून, ती साधारण एप्रिल २०२६ पूर्वी फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित होणार आहे. अंतराळवीर चंद्राच्या पलीकडे सुमारे चार हजार ६०० मैलांचा प्रवास करून पॅसिफिक महासागरात सुरक्षित परतणार आहेत. या मोहिमेत नासाचे अंतराळवीर रीड वाइझमन, व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टीना कोच; तसेच कॅनेडियन स्पेस एजन्सीचे अंतराळवीर जेरेमी हॅन्सन सहभागी असणार आहेत. स्पेस लॉन्च सिस्टीम (एसएलएस) रॉकेटद्वारे होणारी ही मोहीम चंद्रावर मानवी वसाहतींच्या दिशेने टाकलेले निर्णायक पाऊल मानली जात आहे.