ग्रेस (गुणीजन रिसर्च, आर्ट, कल्चर अँड एज्युकेशन) फाउंडेशनतर्फे उस्ताद झाकीर हुसेन यांच्या ७५व्या जयंतीनिमित्त ‘हार्टबीट्स - द म्युझिक विदिन’ या प्रतिष्ठित संगीत अनुभवाचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. ९ मार्च रोजी नव्या पिढीच्या सुरांसह तब्बल १८ वर्षांनंतर हार्टबीट्स पुन्हा रंगमंचावर येत आहे.
संगीत अभ्यासक, तज्ज्ञ शशी व्यास यांनी २००८मध्ये ‘हार्टबीट्स– द म्युझिक विदिन’ या संगीत संकल्पनेची निर्मिती केली. उस्ताद झाकीर हुसेन यांनी ही संकल्पना ऐकल्यावर तेव्हा आपला सहभाग नोंदवला होता.
पहिल्या ‘हार्टबीट्स’ कार्यक्रमात उस्ताद झाकीर हुसेन, शंकर महादेवन, व्ही. सेल्वागणेश, यू. श्रीनिवास आणि शिवमणी यांसारख्या महारथींनी एकत्र येऊन मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि कोलकाता येथे हा कार्यक्रम सादर केला. आता २०२६मध्ये नव्या पिढीच्या सुरांसह पुनरागमन होत आहे. एस. आकाश (बासरी), मेहताब अली नियाझी (सतार), सिद्धार्थ बेलमन्नू (गायन), शिखरनाद कुरेशी (ड्रम्स), स्वामीनाथन सेल्वगणेश (कंजिरा), इशान घोष (तबला), कौशिकी जोगळेकर (कीबोर्ड) सहभागी होणार आहेत.
हा कार्यक्रम प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिराच्या मुख्य सभागृहात सोमवार, ९ मार्च रोजी सायं. ६.३० वाजता होणार आहे. यासाठी विनामूल्य प्रवेश असून नोंदणी आवश्यक आहे.
नोंदणी (व्हॉट्सॲप) : ७०४५५९७५०५, ९७०२७५३२३४





