‘माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या मागे कोणताही बिल्डर किंवा लॉबी असल्याचा कोणताही पुरावा आढळलेला नाही. अनमोल बिश्नोई या गुंडाच्या नेतृत्वाखाली संघटित टोळीने आपली दहशत पसरवण्याच्या, वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या आणि आर्थिक फायद्याच्या कारणाखाली ती हत्या घडवल्याचे तपासात आढळले आहे’, अशी भूमिका मुंबई पोलिसांनी प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली आहे. त्याचबरोबर सिद्दिकी यांच्या पत्नी शेहझीन सिद्दिकी यांचा जबाब नोंदवण्याचे आतापर्यंतचे प्रयत्न त्यांच्या असहकार्यामुळे अयशस्वी ठरले असल्याचेही पोलिसांनी म्हटले.





