Fire In Odisha Hospital Claims 10 Patients The Worst Incident In The Hospital
ओडिशामध्ये अग्निकांड;१० रुग्ण मृत्युमुखी
महाराष्ट्र टाइम्स•
ओडिशामधील कटक येथील सरकारी रुग्णालयात भीषण आग लागली. अतिदक्षता विभागात लागलेल्या या आगीत १० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुग्णांना वाचवताना ११ कर्मचारीही जखमी झाले. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
ओडिशातील कटक येथील ‘एससीबी’ सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) मध्यरात्रीनंतर आग लागली. या दुर्घटनेत १० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुग्णांना वाचवताना ११ कर्मचारीही भाजले. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी सोमवारी ही माहिती दिली.
‘एससीबी’ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर विभागातील अतिदक्षता विभागात रात्री २.३० ते ३च्या सुमारास आग भडकली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, तोपर्यंत आगीने मोठे रूप धारण केले होते.आग लागली तेव्हा ट्रॉमा केअरच्या अतिदक्षता विभागात एकूण २३ रुग्ण होते. यापैकी सात रुग्णांचा आगीमुळे जागीच मृत्यू झाला. उर्वरित रुग्णांना वाचवण्याच्या प्रयत्नात ११ कर्मचारीही भाजले. या घटनेने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे.