मनसेतून जुन्या-नव्या चेहऱ्यांना संधी

महाराष्ट्र टाइम्स

ठाण्यात मनसेने युतीची बेरीज करत जुन्या-नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. कोपरीतून माजी नगरसेविका राजश्री नाईक यांना पुन्हा उमेदवारी मिळाली. वर्तकनगरमधून संदीप पाचंगे यांच्या पत्नी स्वप्नाली खामकर - पाचंगे यांना तिकीट दिले. उप शहराध्यक्ष मनोहर चव्हाण यांच्या पत्नी सविता चव्हाण आणि प्रभाग अध्यक्ष दिनेश मांडवकर यांच्या पत्नी रक्षा मांडवकर यांनाही उमेदवारी मिळाली आहे. सर्वांनी अर्ज दाखल केले आहेत.

मनसेतून जुन्या-नव्या चेहऱ्यांना संधी
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

ठाण्यात मनसेने युतीची ‘गोळाबेरीज’ करत उमेदवार मैदानात उतरवले आहेत. ठाणे पूर्वेच्या कोपरी येथून २०१२मध्ये मनसेच्या तिकिटावर नगरसेविका म्हणून ठाणे महापालिकेवर निवडून गेलेल्या माजी नगरसेविका राजश्री नाईक यांना पुन्हा पक्षाने संधी देत उमेदवारी दिली. त्यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

मनसेने वर्तकनगर प्रभाग क्रमांक : ७ मधून मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांच्या पत्नी स्वप्नाली खामकर - पाचंगे यांना उमेदवारी दिली. त्यांनी मंगळवारी प्रभागातून रॅली काढत उमेदवारी अर्ज भरला. तसेच उप शहराध्यक्ष मनोहर चव्हाण यांच्या पत्नी सविता चव्हाण यांना प्रभाग क्रमांक : २० येथून आणि मनसेचे प्रभाग अध्यक्ष दिनेश मांडवकर यांच्या पत्नी रक्षा मांडवकर यांना प्रभाग क्रमांक १२ येथून उमेदवारी देण्यात आली.