खेळपट्टीकडे संघाचे लक्ष

Contributed byम. टा. विशेष क्रीडा प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

वर्ल्ड कप टी-२० स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या लढतीसाठी कसून सराव केला. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी खेळपट्टीचे स्वरूप जाणून घेतले. फलंदाजांनी वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा सामना करत सरावाला प्राधान्य दिले. संघातील सर्व खेळाडू सरावात सहभागी झाले होते. फलंदाजीच्या क्रमवारीत बदल होण्याची शक्यता आहे.

t20 world cup important practice session for indian team before semi finals

भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड कप टी-२० क्रिकेट स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वीच्या सरावाच्यावेळी ‘वॉर्मअप’ करीत असताना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्याच कालावधीत मुख्य क्यूरेटर रमेश म्हामूणकर यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, मंगळवारी विद्युतझोतात झालेल्या या सरावात संघातील सर्व खेळाडू सहभागी झाले होते.

उपांत्य फेरीच्या सामन्याच्यावेळी असलेली खेळपट्टी भारतीय संघव्यवस्थापनासाठी नक्कीच मोलाची आहे. भारतीय संघाने विद्युततझोतात सराव केला. खेळपट्टीचे नेमके स्वरुप जाणून घेण्यासाठी त्यामुळेच सरावासाठी संघ येताच गंभीर यांनी खेळपट्टीचे रंग जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, अभिषेक शर्मा वगळता भारतीय संघातील सर्वच फलंदाजांनी दीर्घ सराव केला. अभिषेक प्रामुख्याने सामन्यास दोन दिवस असताना फलंदाजीचा सराव करीत नाही, तेच यावेळीही घडले. त्याने गोलंदाजीचा तसेच क्षेत्ररक्षणाचा सराव केला. भारताच्या सर्वच फलंदाजांनी दीर्घ सरावाऐवजी ब्रेकने सराव करण्यास पसंती दिली होती. अक्षर पटेल तसेच जसप्रीत बुमराहने फलंदाज नसलेल्या नेटमध्ये गोलंदाजीचा सराव केला.

फलंदाजीच्या सरावात अंतिम संघातील फलंदाजांनाच सुरुवातीस पसंती देण्यात आली. त्यामुळे रिंकू सिंग सरावात शेवटी होता. संघातील प्रत्येक फलंदाजाने वेगवान तसेच फिरकी गोलंदाजांसमोर सराव करीत आवश्यकतेनुसार फलंदाजीतील क्रमवारीत गरजेनुसार बदल होऊ शकतो हे संकेतही दिले.