हजारे स्पर्धेत पंड्याही खेळणार?

महाराष्ट्र टाइम्स

हार्दिक पंड्या विजय हजारे वन-डे क्रिकेट स्पर्धेत बडोद्याकडून खेळणार आहे. तो ३ आणि ८ जानेवारीला विदर्भ आणि चंडीगडविरुद्धच्या सामन्यात दिसेल. मात्र, ६ जानेवारीला जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात तो उपलब्ध नसेल. भारतीय संघव्यवस्थापनाने त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेत विश्रांती दिली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तो पूर्णपणे तंदुरुस्त राहावा, ही अपेक्षा आहे.

will hardik pandya play in the vijay hazare trophy

नवी दिल्ली : हार्दिक पंड्या विजय हजारे वन-डे क्रिकेट स्पर्धेतील बडोद्याच्या ३ आणि ८ जानेवारीस होणाऱ्या सामन्यात खेळणार आहे. या लढती अनुक्रमे विदर्भ आणि चंडीगडविरुद्ध आहेत. मात्र, त्याने ६ जानेवारीस होणाऱ्या जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी उपलब्ध नसल्याचेही सांगितले आहे, असे बडोदा संघटनेच्या सूत्रांनी सांगितले. हार्दिक हा न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेत खेळण्यासही उत्सुक होता. मात्र, भारतीय संघव्यवस्थापनाने हार्दिकला त्या कालावधीत विश्रांती घेण्यास सांगितले आहे. हार्दिकने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळावे; तसेच वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळी पूर्णपणे तंदुरुस्त असावे, अशीच संघव्यवस्थापनाची अपेक्षा आहे. हार्दिक अखेरची वन-डे मार्चमध्ये खेळला आहे. चॅम्पियन्स करंडक वन-डे स्पर्धेतील अंतिम सामन्यानंतर तो वन-डे पासून दूर आहे.