उलगडली ग्रंथालय चळवळीची परंपरा

महाराष्ट्र टाइम्स

पुणे नगर वाचन मंदिराने १७८ वर्षांचा प्रवास पूर्ण केला. या ऐतिहासिक संस्थेने शहराच्या ग्रंथालय चळवळीत मोलाची भर घातली आहे. 'हेरिटेज वॉक' या उपक्रमातून संस्थेचा इतिहास उलगडला गेला. दोन हजार पुस्तकांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून, अनेक नवीन प्रकल्प राबवले जात आहेत. दुर्मीळ पुस्तके आणि कागदपत्रांच्या प्रतिकृतीही दाखवण्यात आल्या.

उलगडली ग्रंथालय चळवळीची परंपरा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘पुणे नगर वाचन मंदिर या सात फेब्रुवारी १८४८ रोजी स्थापन झालेल्या संस्थेने यंदा १७८ वर्षे पूर्ण केली. शहराच्या ग्रंथालय चळवळीत अशा स्वरूपाचा पल्ला गाठणारे हे एकमेवाद्वितीय वाचन मंदिर आहे,’ अशा शब्दांत संस्थेचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे यांनी या ग्रंथालयाचे महत्त्व सांगितले. निमित्त होते ‘हेरिटेज वॉक’ या उपक्रमाचे.

‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’, ‘एन्शंट ट्रेल्स’, ‘क्लब हेरिटेज’ आणि ‘एच. व्ही. देसाई महाविद्यालया’चा इतिहास विभाग यांच्यातर्फे हा वॉक झाला. ‘महाराष्ट्र टाइम्स’ या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर आहे.

ग्रंथालयाचे सहकार्यवाह प्रसाद जोशी यांनी इतिहास सांगितला. कार्यवाह स्वाती ताडफळे यांनी आतापर्यंत दोन हजार पुस्तकांचे ‘डिजिटायझेशन’ केल्याचे सांगितले. ‘शासकीय अनुदान न घेता संस्था अनेक प्रकल्प राबविते आहे,’ असे सांगून आगामी प्रकल्पांची माहितीही ताडफळे यांनी दिली. ग्रंथपाल स्वाती गोकुळे यांनी दुर्मीळ पुस्तके, कागदपत्रे प्रतिकृतींच्या माध्यमातून दाखवली. प्रा. डॉ. विद्या तिकुटे, प्रा. वंदना मानकर, प्रा. आकांक्षा कामठे, प्रा. तेजस्विनी कोळेकर यांचे उपक्रमासाठी सहकार्य लाभले. पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. अध्यक्षपदी प्रा. डॉ. गणेश राऊत होते. उमेश पोटे यांनी आयोजन केले.