टिपू सुलतानाच्या प्रतिमेमुळे वाद

महाराष्ट्र टाइम्स

मालेगाव शहरात उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनात टिपू सुलतान यांची प्रतिमा लावण्यात आली आहे. यावरून समाजमाध्यमांवर तीव्र निषेध व्यक्त होत आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी यावर आक्षेप घेतला आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनी ही प्रतिमा तातडीने काढून टाकण्याची मागणी केली आहे. शहराची शांतता टिकवण्यासाठी प्रशासनाने कारवाई करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

controversy arises over tipu sultans portrait in deputy mayors hall

उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनात टिपू सुलतान यांची प्रतिमा लावण्यात आल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. समाजमाध्यमांवर या प्रकरणी जोरदार निषेध नोंदवून आक्षेप घेतला जात आहे. यावर शहराच्या पश्चिम भागातील हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

‘उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतानाची प्रतिमा काढून टाकावी,’ अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनात लावण्यात आलेली ही प्रतिमा समाजमाध्यमांत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. ‘मालेगाव शहराची शांतता टिकवून ठेवण्यासाठी; तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने उपमहापौरांच्या दालनातील वादग्रस्त प्रतिमा तातडीने काढावी व कायदेशीर कारवाई करावी,’ अशी मागणी जिल्हाप्रमुख संजय दुसाणे, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, प्रकाश पवार, संजय घोडके, नगरसेवक नीलेश आहेर यांनी केली आहे.