सरला माहेश्वरीयांचे निधन

महाराष्ट्र टाइम्स

दूरदर्शनवरील प्रसिद्ध वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे दिल्लीत निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. १९७६ ते २००५ या काळात त्यांनी दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून काम केले. १९८०-९० च्या दशकात त्या घराघरात पोहोचल्या होत्या. त्यांच्या निधनाने दूरदर्शन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली.

famous news anchor sarla maheshwari from doordarshan passes away
नवी दिल्ली येथे गुरुवारी माजी दूरदर्शन वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. १९७६ ते २००५ या काळात त्यांनी दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून काम केले. त्यांच्या सहकारी शम्मी नारंग यांनी या दुर्दैवी घटनेची माहिती दिली.

सरला माहेश्वरी या १९८० आणि ९० च्या दशकात दूरदर्शनवरील एक अत्यंत लोकप्रिय चेहरा म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या निधनाने दूरदर्शनच्या जुन्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या बातम्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या.