अमेरिकेतील ‘जनरल मिल्स इन्क’ या खाद्योत्पादन कंपनीचा भाग असलेल्या ‘ जनरल मिल्स इंडिया ’ने नाशिकमध्ये १०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, त्यामुळे ५००हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सिन्नरच्या माळेगाव औद्योगिक वसाहतीत कंपनीच्या उत्पादन प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन झाले.
‘जनरल मिल्स’द्वारे ‘ पिल्सबरी ’ या केक व बेकरी उत्पादनाची विक्रीही केली जाते. कंपनीचा नाशिकमधील प्रकल्प संबंधित उत्पादनांच्या पुरवठा साखळीला बळ देणारा ठरणार असून, मालाची ने-आण करण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. त्यामुळे या उत्पादनांची उपलब्धता वाढणार आहे. याशिवाय या प्रकल्पामुळे उत्पादन, लॉजिस्टिक व पूरक सेवांमध्येही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.





