Daring Drug Trafficking Incident By Indore Tourists Leads To Arrest
इंदूरहून ट्रॅव्हल्सने ड्रग्जची तस्करी
महाराष्ट्र टाइम्स•
नागपुरात इंदूरहून ट्रॅव्हल्सने एमडीची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून एका तस्कराला अटक केली. त्याच्याकडून एक कोटी रुपयांची एमडी पावडर जप्त करण्यात आली. हा तस्कर क्रिकेट बुकी असून त्याच्यावर जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी ही कारवाई केली.
नागपूर : इंदूरहून ट्रॅव्हल्सने नागपुरात एमडी (MD) नावाच्या अमली पदार्थाची तस्करी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने आग्याराम देवी चौक परिसरात सापळा रचून एका तस्कराला अटक केली. त्याच्याकडून तब्बल एक कोटी रुपये किमतीची एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे. संजय रामप्रसाद गंगवानी (वय ५१) असे अटक झालेल्या तस्कराचे नाव आहे. तो क्रिकेट बुकी असून त्याच्यावर जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये दोन गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांना शुक्रवारी सायंकाळी ही माहिती मिळाली की, गंगवानी याने इंदूरहून ट्रॅव्हल्सने एमडीची मोठी खेप मागवली आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त राहुल माकणीकर यांनी तातडीने अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर पथकाने सापळा रचून संजय गंगवानीला रंगेहाथ पकडले. त्याच्या ताब्यातून एक कोटी रुपयांची एमडी पावडर जप्त करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय गंगवानी हा क्रिकेटवर सट्टा खेळवणारा बुकी आहे आणि त्याच्यावर यापूर्वी जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये दोन गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे नागपुरात अमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.