अंधेरीत रंगलाय पुष्पोत्सव

महाराष्ट्र टाइम्स

अंधेरीत सुरू झालेल्या पुष्पोत्सवात फुलांपासून बनवलेल्या कलाकृती पाहायला मिळत आहेत. मोर, फुलपाखरू, हत्ती आणि घोड्यांच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहेत. शनिवारी अभिनेते अक्षय कुमार यांच्या हस्ते या उत्सवाचे उद्घाटन झाले. हा दोन दिवसीय उत्सव १५ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. मुंबई महापालिकेने आयोजित केलेला हा उत्सव नागरिकांसाठी एक खास अनुभव आहे.

अंधेरीत रंगलाय पुष्पोत्सव
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

रंगीत फुलांनी साकारलेल्या वाद्यांच्या प्रतिकृतींसह फुलांनी सजविलेले मोर, फुलपाखरू, हत्ती, घोडे या आगळ्या कलाकृती पाहण्याची संधी आता पश्चिम उपनगरातील अंधेरीत आयोजित पुष्पोत्सवातही मिळणार आहे. अभिनेते अक्षय कुमार यांच्या हस्ते शनिवारी या पुष्पोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. पुष्पा नरसी उद्यानात हा दोन दिवसीय उत्सव भरवण्यात आला असून तो आज, १५ फेब्रुवारीपर्यंत असेल, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली.

पुष्पोत्सव ाच्या शनिवारी झालेल्या उद्घाटन सोहळ्याला मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, आमदार अमित साटम यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. महानगरपालिकेद्वारे दक्षिण मुंबईत नुकताच मुंबई पुष्पोत्सव आयोजित करण्यात आला होता. या प्रदर्शनाला तब्बल दीड लाख मुंबईकरांनी भेट दिली. यापाठोपाठ आता पश्चिम उपनगरात अंधेरीतही पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘मुंबई शहर हे खूप धावपळीचे शहर आहे. महानगरपालिकेने सुंदर पुष्पोत्सव आयोजित केला आहे. हा पुष्पोत्सव वर्षातून दोनदा भरवायला हवा,’ असे मत यावेळी अभिनेते अक्षय कुमार यांनी व्यक्त केले.