अनुपस्थितीवरून नाराजी

महाराष्ट्र टाइम्स

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे सोमवारी पुन्हा एकदा गोंधळ उडाला. अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा सुरू असताना कामगारमंत्री सभागृहात हजर नव्हते. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. मंत्र्यांच्या अनुपस्थितीवर आमदारांनी नाराजी व्यक्त केली. मंत्र्यांनीही उत्तरादरम्यान आमदार हजर नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात ही घटना घडली.

chaos in legislature over ministers absence

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सभागृहातील मंत्र्यांच्या अनुपस्थिवरून सोमवारी पुन्हा एकदा गोंधळ उडाला. अर्थसंकल्पातील अनुदानाच्या चर्चेवरील मागण्यांसंबंधी चर्चेदरम्यान विधानसभेत कामगारमंत्री अनुपस्थित असल्याने सत्ताधारी आणि विरोधक आमदारांनी आक्रमक पवित्रा धारण केला. मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून आमदारांनी आक्रमक पवित्रा धारण केला असतानाच मंत्र्यांनीही, उत्तरादरम्यान आमदार हजर नसतात, याकडे सभागृहाचे लक्षले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अर्थसंकल्पाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी सार्वजनिक बांधकाममंत्री, उद्योग उर्जा कामगार व खनिकर्म विभाग, ग्रामविकास विभाग, आदिवासी विकास विभाग, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा समावेश होता. या चर्चेस शिवसेना उबाठाचे आमदार सुनील प्रभू यांनी सुरुवात केली. या वेळी सभागृहात उपस्थित असलेले शंभूराज देसाई, जयकुमार गोरे या मंत्र्यांनी आमदारांच्या अनुपस्थितीवरून नाराजी व्यक्त केली.