एपीएमसी मार्केट तुर्भे, सेक्टर-१९ एफ या भूखंडावरील अनधिकृत झोपड्यांवर कारवाईसाठी गेलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना महिलांनी धक्काबुक्की, तसेच मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात सात महिलांसह एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्याचे आदेश सहाय्यक आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार शुक्रवारी दुपारी महापालिकेचे वसुली अधिकारी संजय गायकवाड हे पथकासह पोलिस बंदोबस्तात ग्रीन पार्क झोपडपट्टी परिसरात पोहोचले. त्यावेळी ही घटना घडली.







