शिवालयांत भक्तिसागर

Contributed byत्र्यंबकेश्वर,नाशिक,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स

महाशिवरात्रीनिमित्त शहर व परिसरातील हजारो शिवभक्तांनी प्राचीन शिवालयांमध्ये गर्दी केली. कपालेश्वर, सोमेश्वर आणि त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी राज्य-परराज्यातून भाविक आले होते. कपालेश्वर मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विविध मंदिरांमध्ये अभिषेक, महाआरती आणि महाप्रसाद वाटपाचे कार्यक्रम झाले. पाथर्डी परिसरातही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंचवटीत शिवनामाचा गजर सुरू होता.

शिवालयांत भक्तिसागर
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘काळाचें भय मानसी धरु नको, दुष्टास शंकू नको. ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभू सोडू नको,’ असे भगवान शिवाचे आर्जव करीत शहर व परिसरातील हजारो शिवभक्तांनी शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी मध्यरात्री उशिरापर्यंत प्राचीन शिवालयांमध्ये दर्शन घेत विधिवत पूजाअर्चना केली.

कपालेश्वर व सोमेश्वर मंदिर व त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी राज्य-परराज्यातून भाविकांनी उपस्थिती लावली. भाविकांच्या वाढत्या गर्दीच्या अंदाजामुळे कपालेश्वर देवस्थानने दोन दिवस व्हीआयपी किंवा शिफारशींसह होणारे दर्शन बंद ठेवले होते. कपालेश्वर मंदिरापासूनची रांग शनिवारी मध्यरात्री थेट गोदाकाठापर्यंत लांबत गेली. या मंदिराकडे येणारा मालेगाव स्टँडकडील रस्ता पूर्णत: बंद करण्यात आला होता. गंगापूर रस्त्यावर सोमेश्वर मंदिरातही भाविकांची शनिवारी मध्यरात्रीपासूनच रांग लागलेली होती.

सोमेश्वर मंदिरातही पहाटेपासून पूजाअर्चना, रुद्राभिषेक झाल्यानंतर भाविकांची गर्दी वाढतच गेली. दिवसभरात येथेही सुमारे ५०० किलो साबूदाणा खिचडी, २५० किलो केळीचे वाटप, भगवान शिवास तिन्ही त्रिकाळ अभिषेक करण्यात आला. महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे व आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते अभिषेक सोहळा पार पडला.

पाथर्डी परिसरात कार्यक्रम

पाथर्डी : महाशिवरात्रीनिमित्त पाथर्डी परिसरातील महादेव मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम झाले. इच्छामणीनगर येथील नागेश्वर महादेव मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी रांग लावली होती. गजानननगर येथील श्री ओमकारेश्वर महादेव मंदिरात सकाळी लघुरुद्र अभिषेक, महाआरती, तसेच सायंकाळी महाप्रसाद वाटप झाले. प्लॅटिनम हॉस्पिटलच्या वतीने डॉ. प्रसाद पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आरोग्य शिबिर झाले. समर्थनगर येथील श्री रामेश्वर महादेव मंदिर देवस्थानच्या वतीने सकाळी रुद्र अभिषेक, हरिपाठ, भजन, महाआरती आदी कार्यक्रम झाले. या वेळी मंदिरात केदारनाथ मंदिराच्या प्रतिकृतीच्या देखाव्याचे सादरीकरण करण्यात आले. आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नवलेनगर येथील श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिर समितीच्या वतीने अभिषेक, महाआरती व महाप्रसाद वाटप झाले. कांचन जगताप (सामनगाव) यांचे कीर्तन झाले. ज्ञानेश्वरनगर येथील श्री नीलकंठेश्वर शिव मंदिरात अभिषेक करण्यात आला.

शिवपार्वती विवाह

पाथर्डी : इंदिरानगरमधील कलानगर येथील ओम रामेश्वरम शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. शिव पार्वती विवाह सोहळ्याच्या या पावन पर्वावर शुक्रवारी मेहंदी, शनिवारी हळदी व रविवारी शिवपार्वती विवाह सोहळा झाला. पहाटे रुद्रअष्टाध्यायी अभिषेकाने मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. गौराई भजनी मंडळाने तीन दिवस भजनसेवा दिली.

पंचवटीत शिवनामाचा गजर

पंचवटी : महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर कपालेश्वर महादेव मंदिरासह पंचवटीतील शिवमंदिरात रविवारी पहाटेपासूनच भाविक ांची गर्दी झाली होती. दुपारी ऐन तीव्र उन्हातही ही गर्दी कमी झाली नव्हती. ‘बम बम भोले’, ‘ओम नम:शिवाय’, ‘हर हर महादेव’ असा गजर करीत भाविक शिवमंदिरात दर्शनासाठी येत होते. कपालेश्वर महादेव मंदिरात पहाटे अभिषेक व पूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. तेव्हापासून मंदिर परिसरात गर्दी झाली होती. सायंकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली.

रामकुंडावर कपालेश्वरसह मनकामेश्वर, तीळभांडेश्वर महादेव मंदिरातील पालख्या येणार असल्याने त्यांच्या अभिषेकाची तयारी करण्यात आली होती. रामकुंडाच्या तिन्ही बाजूंना आकर्षक मंच उभारण्यात आले होते. यशवंतराव महाराज मंदिरासमोर आदिवासी जीवरक्षक दलाने मंच उभारला होता. दुतोंड्या मारुतीच्या सांडव्याजवळही मंडप उभारण्यात आला होता. कपालेश्वर मंदिरात रीघ लागली होती.

वाहतूकमार्ग बंद

भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पंचवटी वाचनालय, पुरिया मार्ग, शनी चौक, सरदार चौक हे रामकुंडाकडे येणारे मार्ग बंद ठेवले होते. मालेगाव स्टँडकडील मार्ग अगोदरच बंद करण्यात आला आहे. कपालेश्वर मंदिर परिसर, रामकुंड, गांधी तलाव, जुना भाजीबाजार पटांगण हे परिसर गर्दीने फुलून गेले होते.

बेलेश्वर मंदिरात अभिषेक

हिरावाडी रोडवरील बेलेश्वर महादेव मंदिरात अभिषेक व पूजा करण्यात आली. महापौर हिमगौरी आडके यांनी या मंदिरात दर्शन घेतले. नगरसेवक हेमंत शेट्टी, गौरव गोवर्धने, नगरसेविका सरिता सोनवणे, मोनिका हिरे, किरण सोनवणे, रुपाली शेट्टी यांनी आयोजन केले होते. भाविकांना प्रसादवाटप करण्यात आले.

‘काळाचें भय मानसी धरु नको, दुष्टास शंकू नको. ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभू सोडू नको,’ असे भगवान शिवाचे आर्जव करीत शहर व परिसरातील हजारो शिवभक्तांनी शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी मध्यरात्री उशिरापर्यंत प्राचीन शिवालयांमध्ये दर्शन घेत विधिवत पूजाअर्चना केली.

कपालेश्वर व सोमेश्वर मंदिर व त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी राज्य-परराज्यातून भाविकांनी उपस्थिती लावली. भाविकांच्या वाढत्या गर्दीच्या अंदाजामुळे कपालेश्वर देवस्थानने दोन दिवस व्हीआयपी किंवा शिफारशींसह होणारे दर्शन बंद ठेवले होते. कपालेश्वर मंदिरापासूनची रांग शनिवारी मध्यरात्री थेट गोदाकाठापर्यंत लांबत गेली. या मंदिराकडे येणारा मालेगाव स्टँडकडील रस्ता पूर्णत: बंद करण्यात आला होता. गंगापूर रस्त्यावर सोमेश्वर मंदिरातही भाविकांची शनिवारी मध्यरात्रीपासूनच रांग लागलेली होती.

सोमेश्वर मंदिरातही पहाटेपासून पूजाअर्चना, रुद्राभिषेक झाल्यानंतर भाविकांची गर्दी वाढतच गेली. दिवसभरात येथेही सुमारे ५०० किलो साबूदाणा खिचडी, २५० किलो केळीचे वाटप, भगवान शिवास तिन्ही त्रिकाळ अभिषेक करण्यात आला. महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे व आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते अभिषेक सोहळा पार पडला.

पाथर्डी परिसरात कार्यक्रम

पाथर्डी : महाशिवरात्रीनिमित्त पाथर्डी परिसरातील महादेव मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम झाले. इच्छामणीनगर येथील नागेश्वर महादेव मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी रांग लावली होती. गजानननगर येथील श्री ओमकारेश्वर महादेव मंदिरात सकाळी लघुरुद्र अभिषेक, महाआरती, तसेच सायंकाळी महाप्रसाद वाटप झाले. प्लॅटिनम हॉस्पिटलच्या वतीने डॉ. प्रसाद पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आरोग्य शिबिर झाले. समर्थनगर येथील श्री रामेश्वर महादेव मंदिर देवस्थानच्या वतीने सकाळी रुद्र अभिषेक, हरिपाठ, भजन, महाआरती आदी कार्यक्रम झाले. या वेळी मंदिरात केदारनाथ मंदिराच्या प्रतिकृतीच्या देखाव्याचे सादरीकरण करण्यात आले. आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नवलेनगर येथील श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिर समितीच्या वतीने अभिषेक, महाआरती व महाप्रसाद वाटप झाले. कांचन जगताप (सामनगाव) यांचे कीर्तन झाले. ज्ञानेश्वरनगर येथील श्री नीलकंठेश्वर शिव मंदिरात अभिषेक करण्यात आला.

शिवपार्वती विवाह

पाथर्डी : इंदिरानगरमधील कलानगर येथील ओम रामेश्वरम शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. शिव पार्वती विवाह सोहळ्याच्या या पावन पर्वावर शुक्रवारी मेहंदी, शनिवारी हळदी व रविवारी शिवपार्वती विवाह सोहळा झाला. पहाटे रुद्रअष्टाध्यायी अभिषेकाने मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. गौराई भजनी मंडळाने तीन दिवस भजनसेवा दिली.

पंचवटीत शिवनामाचा गजर

पंचवटी : महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर कपालेश्वर महादेव मंदिरासह पंचवटीतील शिवमंदिरात रविवारी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. दुपारी ऐन तीव्र उन्हातही ही गर्दी कमी झाली नव्हती. ‘बम बम भोले’, ‘ओम नम:शिवाय’, ‘हर हर महादेव’ असा गजर करीत भाविक शिवमंदिरात दर्शनासाठी येत होते. कपालेश्वर महादेव मंदिरात पहाटे अभिषेक व पूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. तेव्हापासून मंदिर परिसरात गर्दी झाली होती. सायंकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली.

दुपारी तीनच्या सुमारास त्र्यंबकराजाची पालखी निघाली. पालखी पाचआळी भागातून पूर्वसंस्थानिक जोगळेकर वाड्यावरून कुशावर्तावर स्नानासाठी आली. पालखीसोबत पुजारी, शागीर्द, सर्व विश्वस्त, मानकरी, ग्रामस्थांसह भक्तांची उपस्थिती होती. शहरात दिवसभर शिव भजनांचा गजर सुरू होता. नाशिक- त्र्यंबक प्रवासासाठी महामंडळातर्फे दर अर्ध्या तासाला बस सोडण्यात येत होती. त्याचसोबत सिटी लिंकच्या जादा बसदेखील सोडण्यात आल्या होत्या. सिटी लिंक आणि बसचे नेहमीचे स्थानक बंद केल्याने प्रवाशांना दूर अंतरावर पायी जावे लागले. यामध्ये वयोवृद्ध महिला, दिव्यांगांना यातायात सहन करावी लागली.