आंतरप्रेस ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धा मंगळवारपासून

महाराष्ट्र टाइम्स

नागपूरमध्ये आंतरप्रेस ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेला १७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. वसंतनगर मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेत विविध वृत्तपत्रांचे संघ सहभागी होतील. स्पर्धेतील पहिली लढत गतविजेते लोकमत आणि देशोन्नती यांच्यात होईल. किट वितरणाचा कार्यक्रम पार पडला असून, स्पर्धेला अनेक संस्थांचे सहकार्य लाभले आहे. सर्व सामनावीरांचे पुरस्कार गंगाधरराव चिंचोळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिले जातील.

आंतरप्रेस ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धा मंगळवारपासून
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ नागपर्च्यावतीने (एसजेएएन) मंगळवार, १७ फेब्रुवारीपासून आंतरप्रेस ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेला वसंतनगर मैदानावर सुरुवात होणार आहे. स्पर्धेत सहभागी संघांना रविवारी किट्सचे वितरण करण्यात आले.

स्पर्धेतील पहिली लढत गतविजेते लोकमत आणि देशोन्नती यांच्यात मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपासून खेळवण्यात येईल. किट वितरण कार्यक्रमाला रोकडे ज्वेलर्सच्या इव्हेंट मॅनेजर शुभांगीनी खेडीकर, साहाय्यक व्यवस्थापक श्रीपाद दर्भे, ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशनचे डॉ. विजय दातारकर, सामाजिक कार्यकर्ते संजय चिंचोळे यांच्या हस्ते किट्सचे वितरण करण्यात आले. यंदा आंतरप्रेस क्रिकेट स्पर्धेला स्पोर्ट्स कर्मा, रोकडे ज्वेलर्स, सारंगी फाउंडेशन ट्रस्ट आणि स्पोर्ट्स लिंक यांचे सहकार्य लाभले आहे. तर रोकडे ज्वेलर्स यांनी किट्ससाठी सहकार्य केले आहे , तर स्पोर्ट्स लिंकने विस्डेन क्रिकेट चेंडू उपलब्ध करून दिले आहेत. स्पर्धेतील सर्व सामनावीरांचे पुरस्कार गंगाधरराव चिंचोळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येतील. स्पर्धेत टाइम्स ऑफ इंडिया-महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, नवभारत, सकाळ, तरुण भारत, लोकसत्ता, दैनिक भास्कर, पुण्यनगरी आणि देशोन्नतीचे संघ सहभागी होणार आहेत.