Results Of The Devanagari Calligraphy Competition Announced Award Distribution Ceremony In Pune
हस्ताक्षर स्पर्धेचाशुक्रवारी निकाल
महाराष्ट्र टाइम्स•
पुणे मराठी ग्रंथालय आणि महाराष्ट्र टाइम्सने आयोजित केलेल्या देवनागरी हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल शुक्रवारी लागणार आहे. या स्पर्धेत विविध वयोगटांतील ८६५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता पुणे मराठी ग्रंथालयाच्या सभागृहात विजेत्यांना पारितोषिके दिली जातील. या कार्यक्रमाला मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुणे: ‘देवनागरी हस्ताक्षर स्पर्धे’तील विजेत्यांना मराठी राजभाषा दिनी, म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी पुणे मराठी ग्रंथालय ात सायंकाळी सहा वाजता सन्मानित करण्यात येणार आहे. ‘पुणे मराठी ग्रंथालय’ आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’ने आयोजित केलेल्या या स्पर्धेत विविध वयोगटांतील ८६५ जणांनी भाग घेतला होता. सुवाच्य हस्ताक्षराला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती.
‘निर्मलाताई दाबके स्मरणार्थ देवनागरी हस्ताक्षर स्पर्धा ’ २७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत लहान मुलांपासून ते ९९ वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे.पुणे मराठी ग्रंथालयाच्या सभागृहात होणाऱ्या या पारितोषिक वितरण समारंभाला ‘जडणघडण’ मासिकाचे संपादक डॉ. सागर देशपांडे, स्पर्धेसाठी सहकार्य करणारे संजीव दाबके आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक श्रीधर लोणी उपस्थित राहणार आहेत. तसेच ग्रंथालयाचे पदाधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. या स्पर्धेचा उद्देश हा देवनागरी लिपीतील हस्ताक्षराला प्रोत्साहन देणे हा आहे.