रेल्वे स्थानकावरअपघाताचा धोका

महाराष्ट्र टाइम्स

पुणे रेल्वे स्थानकावर प्रवासी फलाटांजवळ ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या मालगाड्या उभ्या केल्या जात आहेत. यामुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे. एका मालगाडीत लाखो लिटर इंधन असते. आग किंवा गळती झाल्यास जीवितहानीची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

serious accident risk at pune railway station
पुणे रेल्वे स्थानकावर प्रवासी फलाटांजवळ ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या मालगाड्या उभ्या केल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. ‘परिवर्तन’ संस्थेचे अध्यक्ष डॉ. शैलेश गुजर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. एका मालगाडीत तब्बल २८ लाख लिटर ज्वलनशील इंधन असू शकते, त्यामुळे आग लागल्यास किंवा स्फोट झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

डॉ. शैलेश गुजर यांनी रेल्वे प्रशासनाला जोखीम व्यवस्थापन, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, अग्निशमन साधने, नियमित सुरक्षा तपासणी आणि सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, "एका कंटेनरमध्ये अंदाजे ७० हजार लिटर इंधन असते आणि एका इंजिनामागे ४० ते ४५ कंटेनर जोडलेले असतात. म्हणजेच एका मालगाडीत २८ लाख लिटर ज्वलनशील इंधन असते. अशा परिस्थितीत आग, स्फोट किंवा गळतीसारखी घटना घडल्यास जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही."
या धोकादायक परिस्थितीमुळे पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.