शेतकऱ्याला बुटाने मारहाण

महाराष्ट्र टाइम्स

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात एका शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मनरेगा अंतर्गत संत्रा फळबागेचे अनुदान रखडल्याने शेतकऱ्याने विचारणा केली असता अधिकाऱ्याने मारहाण केली. या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून विरोधकांनी कारवाईची मागणी केली आहे. कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

farmer beaten by officers shoe video surfaces

गोगरी येथे एका शेतकऱ्याच्या शेतात तपासणी सुरू असताना इतर दोन व्यक्ती त्या ठिकाणी आले. त्यांनी महिला कर्मचाऱ्यांशी उद्धट भाषेत संवाद साधला. त्यातील एक जण महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर धावला. तो शेतकरी नव्हता. तथापि, त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अंगावर धावूनही गेलो, मात्र मारहाण केली नाही. हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत, असे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे पालकमंत्री असलेल्या वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्याच्या गोगरी शेतशिवारात एका कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ‘मनरेगा’अंतर्गत संत्रा फळबाग योजनेंतर्गत मिळणारे अनुदान रखडल्याविषयी या शेतकऱ्याने अधिकाऱ्याकडे विचारणा केली. याविषयीची माहिती देण्याऐवजी अधिकाऱ्याने शेतकऱ्यालाच मारहाण केल्याने संताप व्यक्त होत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.

गोगरी येथील शेतकरी हृषीकेश पवार यांनी दोन वर्षांपूर्वी मनरेगा योजनेंतर्गत तीन एकर क्षेत्रावर संत्रा फळबाग लावली होती. या फळबागेसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान मागील चार महिन्यांपासून रखडले आहे. हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा केला, तरीही काहीही उत्तर मिळालेले नाही. हे घडत असतानाच मंगरुळपीरचे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे गोगरी शिवारात पाहणीसाठी गेले होते. पाहणीदरम्यान हृषीकेश यांनी प्रलंबित अनुदानाबाबत जाब विचारला. मात्र कांबळे यांनी शेतकऱ्याच्या अंगावर धावून जात मारहाण केली; नंतर शिवीगाळ करीत असल्याचेही व्हिडिओत दिसून येत आहे.