निहिरा, आराध्याची चमक; महाराष्ट्र उपांत्यपूर्व फेरीत

महाराष्ट्र टाइम्स

महाराष्ट्राने १५ वर्षांखालील मुलींच्या वन-डे क्रिकेट स्पर्धेत हैदराबादवर सात विकेटनी मात केली. आराध्या पवारच्या अष्टपैलू कामगिरी आणि निहिरा शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर महाराष्ट्राने उपांत्यपूर्व फेरी गाठली. पुदुच्चेरी येथे झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी हैदराबादला १२३ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात निहिराने ५१ धावांची खेळी केली. आराध्याने नाबाद २४ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

maharashtra girls victory impressive performance in the semifinals

आराध्या पवारची अष्टपैलू कामगिरी आणि निहिरा शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर महाराष्ट्राने १५ वर्षांखालील मुलींच्या वन-डे क्रिकेट स्पर्धेत हैदराबादवर सात विकेटनी मात केली आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली.

पुदुच्चेरीमध्ये ही लढत झाली. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, हा निर्णय हैदराबादच्या पथ्यावर पडला नाही. स्वामिनी बेलेकर, श्रावणी रावळ, आराध्या पवार आणि कृष्णा सागरे यांच्या अचूक गोलंदाजीसमोर हैदराबादचा डाव १२३ धावांत आटोपला. अठराव्या षटकात हैदराबादची ७ बाद ५६ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर आइशा शेखने झुंज दिल्यामुळे हैदराबादला शतकी टप्पा पार करता आला.

निहिरा, आराध्याची चमक; महाराष्ट्र उपांत्यपूर्व फेरीत

निहिरा, आराध्याची चमक; महाराष्ट्र उपांत्यपूर्व फेरीत

प्रत्युत्तर देताना निहिरा शर्मा आणि संस्कृती घोरतळे यांनी महाराष्ट्राला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी ७६ चेंडूंत ७७ धावांची सलामी दिली. तेराव्या षटकात दीक्षजाने निहिराला बाद करून ही जोडी फोडली. निहिराने ५१ चेंडूंत आठ चौकारांसह ५१ धावांची खेळी केली. निहिरा परतल्यानंतर झाइना बेगने संस्कृतीला बाद केले. संस्कृतीने ४१ चेंडूंत चार चौकारांसह २९ धावांची खेळी केली. त्यानंतर गायत्री हांडे आणि आराध्या पवार यांनी महाराष्ट्राला विजया समीप पोचवले. अनन्या दंडूने गायत्रीला बाद केले. मात्र, त्यानंतर आराध्याने महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आराध्याने २९ चेंडूंत चार चौकारांसह नाबाद २४ धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक : हैदराबाद - ३२.४ षटकांत सर्व बाद १२३ (आइशा शेख नाबाद ३१, अनन्या दंडू २३, आराध्या पवार २-१०, कृष्णा सागरे २-२२, श्रावणी रावळ २-१८, स्वामिनी बेलेकर २-२३, अनुष्का राठोड १-१९) पराभूत वि. महाराष्ट्र - २४.४ षटकांत ३ बाद १२६ (निहिरा शर्मा ५१, संस्कृती घोरतळे २९, आराध्या पवार नाबाद २४, गायत्री हांडे १४, दीक्षजा १-१५).