‘पाडु’बद्दल माहिती का दिली नाही? : राज ठाकरे

महाराष्ट्र टाइम्स

राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या पाडु यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या यंत्रणेबद्दल माहिती न दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी कुटुंबीयांसह राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही बंधू मुंबादेवी मंदिरात दर्शनासाठी गेले. निवडणुकीत पक्षाला यश मिळावे यासाठी त्यांनी प्रार्थना केली. या भेटीदरम्यान अनेक नेते उपस्थित होते.

raj thackerays angry questions about the padu system

मुंंबईत निवडणूक आयोगाने प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट (पाडु) यंत्रणा आणल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ही यंत्रणा नेमकी काय आहे, निवडणूक आयोगाने हे मशिन कोणलाही दाखविले नाही, यामध्ये मतदानाचे फेरफार होणार नाही, याची शाश्वती कोण देणार, असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सहकुटुंब भेट दिली. तेथून दोन्ही ठाकरे बंधू कुटुंबासह एकत्रितपणे मुंबादेवीच्या मंदिराकडे रवाना झाले. मुंबादेवीच्या चरणी नतमस्तक होऊन निवडणुकीत पक्षाला यश मिळावे, अशी प्रार्थना दोन्ही बंधूंनी केली. या वेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, जयवंती ठाकरे, आदित्य, अमित, उर्वशी यांच्यासह खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, मनसेचे नेते बाळा नांदगावकर आदी उपस्थित होते.