परदेशी धावपटूंची दमछाक

महाराष्ट्र टाइम्स

मुंबई मॅरेथॉनमध्ये रविवारी धावपटूंना नव्या मार्गाचा अनुभव आला. कोस्टल रोडवरील चढ-उतार आणि उकाड्यामुळे अनेक परदेशी धावपटूंना शर्यत सोडावी लागली. इथियोपियाच्या तादू अबाते देमे आणि येशी कलायू चेकोले यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिलांचे जेतेपद पटकावले. भारतीय पुरुषांमध्ये डॉ. कार्तिक करकेरा आणि महिलांमध्ये संजीवनी जाधव विजेते ठरले.

परदेशी धावपटूंची दमछाक
मुंबई: रविवारी झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये कोस्टल रोडवरील नवीन मार्गामुळे अनेक धावपटूंना दमछाक झाली. विशेषतः शर्यतीच्या उत्तरार्धात या मार्गावर धावताना स्पर्धकांना खूप त्रास झाला. यामुळे आठ पुरुषांसह एकूण ११ एलिट धावपटूंनी शर्यत मध्येच सोडली. यापैकी तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. इथियोपियाच्या तादू अबाते देमे आणि येशी कलायू चेकोले यांनी पुरुष आणि महिलांच्या शर्यतीत अनुक्रमे पहिले स्थान पटकावले.

कोस्टल रोडवरील चढ-उतार आणि पुन्हा चढ यामुळे धावपटू खूप थकून गेले होते. शर्यतीच्या उत्तरार्धात वाढलेला उकाडा हे देखील एक मोठे आव्हान होते, असे विजेत्या परदेशी धावपटूंनी सांगितले. रुग्णालयात दाखल केलेल्या दोन पुरुष धावपटूंना दुपारपर्यंत डिस्चार्ज देण्यात आला.
पुरुष गटात इथियोपियाच्या तादू अबाते देमेने २ तास, ९.५५ मिनिटांत शर्यत जिंकली. महिला गटात इथियोपियाच्याच येशी कलायू चेकोलेने २ तास, २५.१३ मिनिटांत अव्वल क्रमांक मिळवला.

भारतीय धावपटूंमध्ये, मुंबईच्या डॉ. कार्तिक करकेराने पुरुष गटात बाजी मारली. त्याने २ तास १९.५५ मिनिटांत शर्यत पूर्ण केली. नाशिकच्या संजीवनी जाधवने महिला गटात विजय मिळवला. तिने २ तास ४९ मिनिटे ०२ सेकंदात शर्यत पूर्ण करून गतविजेत्या निर्माबेन ठाकोर हिला (२ तास, ४९ मि. १३ से.) मागे टाकले. यामुळे निर्माबेनचे हॅटट्रिकचे स्वप्न भंगले.