फ्लोरिडा प्रांतामध्ये आणखी एक मृत्युदंड

Contributed byस्टार्क|महाराष्ट्र टाइम्स

अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतात एका पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी बिली लिऑन कीअर्स याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जानेवारी १९९१ मध्ये वाहतूक तपासणीदरम्यान अधिकाऱ्याने थांबवल्यावर कीअर्सने अधिकाऱ्याचे शस्त्र हिसकावून गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेत अधिकारी डॅनी पॅरिश यांचा मृत्यू झाला होता. फ्लोरिडा प्रांतातील ही या वर्षातील तिसरी मृत्युदंडाची शिक्षा आहे.

another death penalty in florida for police officer murder
अमेरिकेतील फ्लोरिडा येथे एका पोलिस अधिकाऱ्याला त्याच्याच बंदुकीने ठार मारल्याप्रकरणी बिली लिऑन कीअर्स नावाच्या व्यक्तीला मंगळवारी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या वर्षातील ही तिसरी मृत्युदंडाची शिक्षा आहे. १९९१ मध्ये वाहतूक तपासणीदरम्यान पोलिस अधिकारी डॅनी पॅरिश यांनी कीअर्सला थांबवले होते. कीअर्सकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याचे लक्षात आल्यावर पॅरिश यांनी त्याला गाडीतून बाहेर येण्यास सांगितले. यावेळी कीअर्सने पॅरिश यांच्याकडील शस्त्र हिसकावून घेतले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात पॅरिश गंभीर जखमी झाले आणि रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

फ्लोरिडा कारागृहात तीन इंजेक्शन दिल्यानंतर ५३ वर्षीय बिली लिऑन कीअर्स याला सायंकाळी ६.२४ वाजता मृत घोषित करण्यात आले. ही शिक्षा या वर्षातील तिसरी मृत्युदंडाची शिक्षा ठरली आहे. २०२५ मध्ये १९ जणांना मृत्युदंड ठोठावण्यात आला होता.
जानेवारी १९९१ मध्ये, बिली लिऑन कीअर्स चुकीच्या दिशेने गाडी चालवत होता. त्यावेळी पोलिस अधिकारी डॅनी पॅरिश यांनी त्याला थांबवले. कीअर्सकडे वैध वाहन चालक परवाना नव्हता. त्यामुळे पॅरिश यांनी त्याला गाडीतून बाहेर येण्याचे आदेश दिले. त्याला हातकड्या घालण्याचा प्रयत्न केला असता, कीअर्सने पॅरिश यांचे शस्त्र हिसकावून घेतले. त्यानंतर त्याने पॅरिश यांच्यावर १४ गोळ्या झाडल्या. यापैकी नऊ गोळ्या पॅरिश यांना लागल्या.

एका टॅक्सीचालकाने पोलिसांना मदतीसाठी संपर्क साधला होता. त्यानंतर रुग्णालयात नेण्यात आलेल्या पॅरिश यांचा मृत्यू झाला. वाहतूक तपासणीदरम्यान पॅरिश यांनी कळवलेल्या वाहन क्रमांकाच्या माहितीवरून पोलिसांनी कीअर्सला अटक केली होती.