‘श्रवणालय’ उपक्रमाचे आज लोकार्पण

महाराष्ट्र टाइम्स

आज सायंकाळी गुरुदक्षिणा हॉल येथे 'श्रवणालय' उपक्रमाचे लोकार्पण होणार आहे. वाढत्या मानसिक तणावावर मात करण्यासाठी हा उपक्रम सुरू होत आहे. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वृषिनीत सौदागर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जाईल. महापालिका, मराठा विद्या प्रसारक संस्था, कोवळे किरण संस्था व सप्तशृंगी शिक्षण संस्थेचे सहकार्य लाभले आहे. अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहतील.

the shravanalay initiative being inaugurated today will reduce mental health issues

धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे प्रत्येक व्यक्ती मानसिक दडपणाखाली वावरते आहे. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळत नसल्याने अनेकांच्या भावना अव्यक्तच राहतात. विशेषतः पालक आणि मुलांमधील संवाद कमी होत चालल्याने मानसिक समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘श्रवणालय’ उपक्रमाची सुरुवात होत आहे. या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा आज, शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी साडेचार ते साडेआठ यादरम्यान गुरुदक्षिणा हॉल येथे होणार आहे.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वृषिनीत सौदागर यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाला महापालिका, मराठा विद्या प्रसारक संस्था, कोवळे किरण संस्था व सप्तशृंगी शिक्षण संस्थेचे सहकार्य लाभले आहे. यावेळी महापौर हिमगौरी आडके, सरचिटणीस, ॲड. नितीन ठाकरे, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, राष्ट्रपती पुरस्कृत शिक्षक संदीपान जगदाळे, बि. के. शर्मा, चिन्मय उदगीरकर उपस्थित राहतील.