2 Kilograms Of Heroin Seized In Jammu From Pakistani Drone
पाकच्या ड्रोनमधूनजम्मूत हेरॉइन
महाराष्ट्र टाइम्स•
जम्मू सीमेजवळ पाकिस्तानी ड्रोनमधून पाठवलेले सुमारे दोन किलो हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉइनची किंमत सुमारे १२ कोटी रुपये आहे. जम्मू पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाने बिष्णाह येथील बहादूरपुरा गावात ही कारवाई केली. ड्रोनद्वारे संशयास्पद वस्तू सोडल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहीम राबवण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाकिस्तानने ड्रोनद्वारे पाठवलेले तब्बल दोन किलो हेरॉइन जम्मू मध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळून जप्त करण्यात आले आहे. या हेरॉइनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे १२ कोटी रुपये आहे. जम्मू पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाच्या १०१ बटालियनने बिष्णाह येथील बहादूरपुरा गावात ही कारवाई केली.
बुधवारी रात्रीच्या सुमारास सुरक्षा दलांना ड्रोनद्वारे काही संशयास्पद वस्तू सीमाभागात सोडण्यात आल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे तातडीने शोधमोहीम हाती घेण्यात आली. या शोधमोहिमेदरम्यान, एका दोराला बांधलेल्या मोठ्या पिशवीत हेरॉइनची अनेक छोटी पाकिटे आढळून आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई यशस्वी झाली असून या प्रकरणी बिष्णाह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.