सामाजिक संस्थांना ३० लाखांचा निधी

महाराष्ट्र टाइम्स

बँक ऑफ महाराष्ट्र सेवानिवृत्त कर्मचारी कल्याण संस्थेने (बोमरेओ) यंदा ९० सामाजिक संस्थांना ३९ लाख रुपयांचा निधी दिला. डॉ. सुनीता गोडबोले यांचा पद्मश्री पुरस्काराबद्दल सत्कार करण्यात आला. संस्थेने आतापर्यंत तीन कोटी रुपयांची मदत केली आहे. बँकही सामाजिक जबाबदारी म्हणून असे उपक्रम राबवण्याचा विचार करत आहे.

सामाजिक संस्थांना ३० लाखांचा निधी
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

डॉ. सुनीता गोडबोले यांच्या बस्तर येथील आदिवासी नागरिकांसाठी केलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल आणि या कार्याबद्दल केंद्राचा त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. रौप्यमहोत्सवी स्मरणिकेसाठी विशेष योगदान देणाऱ्या डॉ. चंद्रशेखर बारगजे, माधव लेले, मधुसूदन निमकर यांचाही सत्कार करण्यात आला.

भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र सेवानिवृत्त कर्मचारी कल्याण संस्थेच्या ( बोमरेओ ) वतीने यंदा विविध ९० सामाजिक संस्थांना ३९ लाख रुपयांचा निधी देण्यात आला.

सामाजिक कार्यकर्त्या भारती ठाकूर, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निधु सक्सेना, संघटनेचे संस्थापक बाळासाहेब फडणवीस, नारायण अचलेरकर, मोहन घोळवे, भास्कर माणकेश्वर, डॉ. सुनील देशपांडे या वेळी उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजातील उपेक्षित, दिव्यांग, गतिमंद, कृषी, आरोग्य, क्रीडा, पर्यावरण, गो-सेवा, शैक्षणिक आदी सामाजिक सेवा क्षेत्रांतील काम करणाऱ्या संस्था, नागरिकांना संघटनेच्या सदस्यांनी स्वतः निधी गोळा करून आतापर्यंत तीन कोटी रुपयांची मदत केली आहे, असे महासचिव नारायण अचलेरकर यांनी सांगितले.

‘सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांची ‘बोमरेओ’ संघटना करीत असलेल्या कार्याची प्रेरणा घेऊन बँकही सामाजिक जबाबदारी म्हणून असे उपक्रम करायचा विचार करीत आहे,’ असे सक्सेना यांनी सांगितले. संघटनेचे कार्याध्यक्ष भास्कर माणकेश्वर यांनी प्रास्ताविक केले. सानिका खोपकर यांनी आभार मानले.