शिवभक्त सुरेश पवार यांचे निधन

महाराष्ट्र टाइम्स

महाड येथील कोकणकडा मित्रमंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार यांचे निधन झाले. रायगड जिल्ह्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. शिवराज्याभिषेक सोहळ्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी महाड येथे शिवकालीन वस्तूंचे संग्रहालय उभारले. त्यांच्या निधनाने एक महान समाजसेवक हरपला आहे.

शिवभक्त सुरेश पवार यांचे निधन
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

महाड येथील कोकणकडा मित्रमंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार (६२) यांचे शनिवारी सरेकर आळी येथील निवासस्थानी निधन झाले. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रायगड जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात सुरेश पवार यांचे योगदान मोठे होते. रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमात त्यांचा सिंहाचा वाटा असे. महाड येथे त्यांनी शिवकालीन वस्तूंचे संग्रहालय उभारले. कोकणकडा मित्रमंडळ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी असंख्य तरुणांना प्रेरणा दिली. त्यांच्या निधनामुळे एक महान समाजसेवक हरपला आहे,’ अशी भावना इतिहासप्रेमी अजय धनावडे यांनी व्यक्त केली.