हरिनाम सप्ताहाचा उत्साहात समारोप

महाराष्ट्र टाइम्स

खंडापूर शिवारात झालेल्या हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. या सोहळ्याला लाखो भाविक उपस्थित होते. मराठवाड्यात प्रथमच सात संतांच्या पादुकांचे एकाच ठिकाणी दर्शन घडले. भाविकांनी अनवाणी पायाने रांगेत उभे राहून दर्शन घेतले. दहा दिवस चाललेल्या या सप्ताहात अन्नदान सेवा सुरू होती. शेवटच्या दिवशी पुरणपोळीचा बेत होता.

हरिनाम सप्ताहाचा उत्साहात समारोप
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

तालुक्यातील खंडापूर शिवारातील नव्या मार्केट यार्डच्या जागेवरील अखंड हरिनाम सप्हात कुंभमेळा वारकर् यांचा या भक्तीभावाने ओतप्रोत भरलेल्या अध्यात्मीक सोहळ्याची सांगता आज हभप छोटे कदम महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता झाली. लोकसहभागातून साकारलेल्या या अध्यात्मिक सोहळ्याला सोमवारी किमान सात लाखांपेक्षा अधिक भाविकांची उपस्थिती होती. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने मराठवाड्यात प्रथमच एकाच वेळी एकाच ठिकाणी सात संतांच्या पादुकांचे दर्शन घेण्याची संधी वारकर् यांना मिळाली.

संत श्री ज्ञानेश् वर महाराज, संत श्री तुकाराम महाराज, संत श्री नामदेव महाराज, संत जनाबाई, संत सावता माळी आदी संताच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी किमान चार किलोमीटरची रांग लागली होती.

लाखो भाविकांनी या पादुकांचे दर्शन घेतले. विविध मांडवांत सुरू असलेल्या कीर्तनसेवेलाही भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती.

या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे येणार् या भाविक ांच्या जेवणातील पोळी-भाकरी ही दहा दिवस दहा तालुक्यातील घराघरांतून आली होती. सप्ताहाच्या ठिकाणी फक्त भात, वरण, भाजी, गोड पदार्थ शिजवले जात होते. रात्रंदिवस अन्नदान सेवा सुरू होती. सोमवारी शेवटच्या दिवशी लातूर तालुक्यातून किमान सात लाख पुरण पोळ्या एकत्र झाल्या होत्या. प्रत्येक भाविकाला पूरणपोळी, तूप आणि दूध असा बेत होता. लातूर तालुक्यातील प्रत्येक गावातून, लातूर शहरातून पुरणपोळ्या भाविकांनी दिल्या होत्या. जेवण झाल्यानंतर प्रत्येक भाविकाला पुन्हा प्रसाद म्हणून पुरणपोळी देण्यात आली. गेले नऊ दिवस खंडापूरचे शिवार जागेच होते. रणरणत्या उन्हातही हजारो भाविक अनवाणी पायाने रांगेत उभे राहून दर्शन घेत होते.