१९२३ मध्ये आजच्याच तारखेला इन्सुलिन सर्वसामान्य जनतेला उपलब्ध झाले. यामुळे मधुमेहावरील उपचार सहज सोपा झाला. इन्सुलिन शरीरातील कर्बोदके आणि अतिरिक्त चरबी नियंत्रित करते. यामुळे रक्तामधून नसांपर्यंत साखर पोचण्यास मदत होते. इन्सुलिनचा शोधाचा दीर्घकालीन आणि एकत्रित प्रयत्नांचा इतिहास आहे, ज्याची सुरुवात १८६९ मध्ये पॉल लँगरहँस यांनी केली. ते त्यावेळी स्वादूपिंडाचे संशोधन करीत होते.
सर्वात वयोवृद्ध गोरिलाचा ६९ वा वाढदिवस
जगातील सर्वात वयोवृद्ध गोरिलाने सोमवारी (दि.१३) जर्मनीतील बर्लिन येथे वाढदिवस साजरा केला. फातोऊ नावाच्या या गोरिलाने चेरी टोमॅटो आणि बिट खाल्ले. या घटनेचे फोटो-व्हिडीओ व्हायरल झाले.







