आजपासून फॅशनिस्टा प्रदर्शन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

छत्रपती संभाजीनगरमध्ये फॅशनिस्टा ग्रुप ऑफ एक्झिबिशन्सचे प्रदर्शन १५ ते १६ एप्रिल रोजी हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे भरणार आहे. सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील. दिल्ली, मुंबई, पुणे, नाशिकसह विविध शहरांतील डिझायनर्स यात सहभागी होतील. साड्या, कपडे, दागिने, ॲक्सेसरीज, ब्युटी प्रॉडक्ट्स, होम डेकोर यांसारख्या वस्तू येथे पाहायला मिळतील. शहरवासीयांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा.

आजपासून फॅशनिस्टा प्रदर्शन

छत्रपती संभाजीनगर : फॅशनिस्टा ग्रुप ऑफ एक्झिबिशन्सच्या वतीने बुधवार १५ एप्रिल ते गुरुवार १६ एप्रिल दरम्यान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्लॅमर व ग्रेससह हे प्रदर्शन वरील दोन्ही दिवशी सकाळी अकरा ते रात्री नऊपर्यंत हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे भरविण्यात येणार आहे. २००८ पासून फॅशनिस्टा सातत्याने फॅशन क्षेत्राशी निगडित प्रदर्शनाचे आयोजन करते. दिल्ली,मुंबई, हैदराबाद, रायपूर, गुडगाव, पुणे, नाशिक, कोपरगाव, नागपूर, उज्जैन आदी शहरातंतील प्रीमिअम डिझायनर्स प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. प्रदर्शनास साड्या, कपडे, दागिने, ॲक्सेसरीज, ब्युटी प्रॉडक्टस, होम डेकोर, फर्निशिंग, गिफ्ट सादर केले जाईल. फॅशनिस्टाला एक्झिबिशन्स एक्सलन्स ॲवॉर्डस २०२४ मध्ये ‘एस ऑफ बी सिटीज’ हा सन्मान मिळाला आहे. १५ व १६ रोजी भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनाचा लाभ शहरवासीयांनी घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.