दिल्ली ते देहराडून या रस्ते प्रवासाला सध्या सहा तास लागतात. मात्र, हा महामार्ग पूर्णपणे खुला झाल्यानंतर हाच प्रवास केवळ अडीच तासांवर येईल. विमानाचा विचार केल्यास या प्रवासासाठी साधारणपणे ५५ मिनिटे ते एक तास १० मिनिटे इतका वेळ लागतो. परंतु, विमानतळापर्यंत पोहोचण्यापासून ते चेक-इन, चेक आऊट आदी बाबींचा हिशेब केल्यास हा प्रवासही पाच तास किंवा त्याहून अधिक तासांचा होतो.
बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित दिल्ली-देहराडून इकोनॉमिक कॉरिडोरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उद्घाटन केले. या अतिशय महत्त्वाच्या प्रकल्पामुळे दिल्ली ते देहराडून हे अंतर अवघ्या अडीच तासांत कापता येणार आहे. आतापर्यंत या अंतरासाठी सहा तास लागत होते. मात्र, हा द्रुतगती महामार्ग पूर्णपणे खुला झाल्यानंतर या दोन शहरांदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि अधिक सुलभ होणार आहे.
‘कलम ३७० रद्द केल्यानंतर आता संपूर्ण देशभरात राज्यघटना पूर्णपणे लागू झाले आहे. ‘एनडीए’ सरकार प्रत्येक गरिबाला सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे,’ अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिली. दिल्ली-देहराडून महामार्गाच्या उद्घाटनानंतर येथील एका जाहीर सभेत ते बोलत होते. ‘आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. देशातील जनतेच्या वतीने मी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो,’ असे मोदी म्हणाले.





