उद्योगपती वासुदेव श्रॉफ यांचे निधन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

देवळाली कॅम्प येथील अनिवासी भारतीय उद्योगपती वासुदेव श्यामदास श्रॉफ यांचे दुबई येथे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय प्रवासी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी अनेक सामाजिक कार्यांमध्ये योगदान दिले होते. देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल रक्तपेढी, शाळा, मंदिरे आदींची निर्मिती त्यांनी केली होती.

उद्योगपती वासुदेव श्रॉफ यांचे निधन

नाशिकरोड : देवळाली कॅम्प येथील अनिवासी भारतीय उद्योगपती वासुदेव श्यामदास श्रॉफ (वय ८६) यांचे दुबई येथे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वासुदेव श्रॉफ यांना आंतरराष्ट्रीय प्रवासी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. देवळाली रत्नसह अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले होते. त्यांनी देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल रक्तपेढी, शिंगवे बहुला व संसरी येथे शाळा, सर्वतीर्थ टाकेद मंदिर, गवळीवाडा दत्त मंदिर, भोलेनाथ मंदिर, वडनेर रोडवरील साईबाबा मंदिर, संसरी गावातील साईबाबा व भोलेनाथ मंदिर, भोपाळ येथे शाळा व मंदिर आदींची निर्मिती केली होती.